beedupdate

Beed jilha daily News update, Yojana update etc.

Blog

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप – शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी.

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप करण्याची योजना राज्य सरकारद्वारे चालवण्यात येत आहे. त्यासाठी असणाऱ्या योजनेचेे नाव, अटी, शर्ती, किंवा लाभधारक कोण असावा याबद्दल या लेखात आपण पाहणार आहोत. या योजनेचा फायदा घेऊन लाभार्थी कमी पैशात आणि उत्तम प्रकारचा आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.

 

योजनेचा प्रकार :- वैयक्तिक लाभाची योजना.

 

योजनेचे नाव :- नाविन्यपुर्ण योजना – ०६/०४/०२ संकरित गाई किंवा म्हशींची गट वाटप करणे.

 

योजनेचा शासन निर्णय :- शासन निर्णय क्र. राज्ययो-२०१२/प्र.क्र.१५९/पदुम-४, मंत्रालय, मुंबई-३२.

 

योजना लागू असणारा प्रवर्ग :- सर्वसाधारण/अनुसूचित जाती /आदिवासी जमाती

 

योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :-

१) ६ दुधाळ जनांवरे प्रकल्पाची एकुण किंमत- रु.३३५१८४/-

२) ४ दुधाळ जनांवरे प्रकल्पाची एकुण किंमत- रु.१७०१२५/-

३) २ दुधाळ जनांवरे प्रकल्पाची एकुण किंमत -रु. ८५०६१/-

सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या ५० त्न अनुदान आणि अनुसूचित जाती /आदिवासी जमाती साठी प्रकल्प किंमतीच्या ७५ % अनुदान देय राहील.

 

योजनेच्या प्रक्रियेला लागणारा अंदाजे वेळ-  ९० दिवस

 

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप या योजनेसाठी असणाऱ्या प्रमुख अटी :-

१. लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास ६ गाई/ म्हशी, ४ गाई / म्हशी , २ गाई / म्हशी या प्रमाणे जनावरांची गट खरेदी तसेच दिलेल्या आराखड्याप्रामाने गोठा आणि चारा शेड यांचे व्यवस्थित बांधकाम करणे बंधनकारक आहे.

२. एकूण जेवढ्या लाभार्थ्यांची निवड करायची असेल त्यातील ३ टक्के विकलांग असतील तर त्याचबरोबर ३० टक्के महिला यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

३. ज्या लाभार्थ्यांना या योजने अंतर्गत गाई किंवा म्हशीं मिळालेल्या आहेत त्यांनी पशुंवर्धन विभागातील अधिकारी यांना वेळोवेळी पाठपुराव्यासाठी आवश्यक त्या वेळी जनावरे उपलब्ध करून द्यावीत.

४. या योजनेतून लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या गाई किंवा म्हशीं यांना काही आजारी झाल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन त्यावर उपचार करावेत किंवा त्यांच्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावा.

५. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे अश्या लाभार्थ्यांनी जणावरची ३ वर्ष योग्य देखभाल करून त्यातून व्यवसाय करवा. तसेच या जनावरांच्याना विम्याचे बिल्ले असतील, त्यातील एखाद्या जनावराचा बिल्ला जरी तुटून पडला तरी बँक/ विमा कंपनी किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांना त्वरीत संपर्क साधणे आवश्यक आहे.

६. योजनेअंतर्गत प्राप्त झालेले गाय/म्हैस मृत पावल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास सूचित करून मृत जनांवराचे शवविच्छेदन करून घेणे व मिळणाऱ्या विमा रकमेतून गाय/म्हैस खरेदी करणे बंधनकारक राहील.

७. या योजनेतून मिळणाऱ्या जनावरांचे साथीच्या रोगांपासून संरक्षण करणे आणि त्यांचे लसीकरण करणे ही जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.

८. या योजेअंतर्गत तुम्हाला मिळालेल्या गाई किंवा म्हशीं काही कारणांसाठी (न निराकरण होणाऱ्या आरोग्य तक्रारी) विकायचे असतील तर पशुसंवर्धन विभाग चे जे अधिकारी असतील त्यांच्या परवानगी शिवाय तुम्ही विकू शकत नाही.

९. लाभधारक हा कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय सेवेचा पदाधिकारी नसावा/ निवृत्त अधिकारी नसावा.

१०. या योजनेचा लाभ या अगोदर घेतलेला नसावाा या योजनेचा लाभ लाभधारकांना एकदाच मिळतो..

११. या योजनेमध्ये देण्यात आलेल्या दुधाळ जनावरांना वनक्षेत्रात चरण्यासाठी सोडू नये. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला जाऊ शकतो.

 

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

१. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत

२. ७/१२ व ८-अ उतारा त्यासोबतच ग्रामपंचायत नमुना नं. ८.

३. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत

४. जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

५. बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र

६. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाची सत्यप्रत.

७. अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)

 

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत :-

नजिकचा पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.

 

दुधाळ संकरित गाई किंवा म्हशींचा गट वाटप या योजनेसाठी कुठे संपर्क करावा :-

१. पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती

२. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद,

३.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

 

ऑनलाईन अर्ज कुठे करावा :- याायोजनेसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्धध नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *