beedupdate

Beed jilha daily News update, Yojana update etc.

Blog

Kisan Credit Card: KCC शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना.

Kisan Credit Card

Kisan Credit Card : KCC शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना.

Kisan Credit Card: KCC  शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून सरकारद्वारे किसान क्रेडिट कार्ड योजना ( KCC Scheme) अंतर्गत आपल्यासाठी कमी व्याज दरात ही योजना सुरू केली आहे.

या आर्थिक सहायातून शेतकरी आपली गरज भागवू शकतात. शेतकऱ्या
ने जर दिलेल्या वेळेवर आपली रक्कम परत केली तर त्यांना या योजनेचा चांगलाच लाभ होऊ शकतो. भरपूर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
योजनेचे स्वरूप कसे असेल?
आपले शेतकरी अगोदर सावकारांकडून कर्ज घेऊन खूप मोठ्या प्रमाणात व्याज भरत होते. आता शेतकऱ्यांना कमी व्याज दरात आणि सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध होणार आहे.
सरकार च्या या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त ७ टक्के व्याज दरात कर्ज मिळणार आहे. आणि जर शेतकऱ्याने नियमित वेळात व्याज भरले तर या ७ टक्के व्याज दरातून ३ टक्के सूट कर्ज वजा केले जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त ४ टक्के व्याजराने पैसे मिळणार आहेत.
कोणते लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
या योजने साठी लाभ मिळवनाऱ्याचे वय हे १८ ते ७५ वर्ष असावे. या योजने अंतर्गत खते, बियाणे, मशीन इत्यादी गोष्टींसाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत शेतकरी ३ लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
Kisan Credit Card: KCC शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना. या योजनेचा लाभ शेतकरी मित्रांनी नक्की घ्यावा. शासकीय योजनेची अधिक माहिती घेऊन आपण आपल्या बँकेत फॉर्म भरू शकता.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *